राजापूर/ प्रतिनिधी- राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंड करत अपक्ष लढण्यासाठी सज्ज झालेले लाड शिट्टी या चिन्हावर ही निवडणूक लढवित आहेत.
▪️मी गेले १०वर्ष काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजापूर लांजा तालुक्यात काम केले आहे. मागिल विधानसभा निवडणुकीत थोड्याच मतांनी पराभूत झालो. असलो तरी मतदारसंघात स्थानिक भूमीपुत्रांसाठी केलेली कामे ही जनतेच्या समोर असल्याने तसेच गेली १५ वर्षे या विद्यमान आमदाराने केले काय? असा प्रश्न जनताच विचारत असल्याने माझा विजय निश्चितच असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीत बंड करत अपक्ष उभे ठाकलेले उमेदवार व कुणबी समाजाचे नेते अविनाश लाड यांनी केले आहे.
▪️यावेळी बोलताना उमेदवार अविनाश लाड यांनी महाआघाडी व महायुतीचे उमेदवार हे स्थानिक नसून विद्यमान आमदार यांनी गेल्या १५ वर्षात केले काय ? असा सवाल करत राजापूर व लांजा एस. टी. स्टॅण्डचा प्रश्न प्रलंबित, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाढती ट्रैफिक, पाण्याचा प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेल्या रस्ताचा प्रश्न. बेरोजगारी हटविण्यात आले अपयश. आरोग्य सुविधांची वानवा आदी प्रश्न सोडविण्यास हे १५वर्ष आमदार असुन ही सपशेल अपयशी ठरले असून या निवडणुकीत जनताच यांना घरी बसवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
▪️शिट्टी हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यासाठी माझे कार्यकर्ते व पदाधिकारी आजपासून कामाला लागले असून किमान दोन वेळा आम्ही प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधू असेही त्यांनी सांगितले.
▪️ही निवडणूक जिंकण्याच्या इर्षेनेच आम्ही मैदानात उतरलो असून मतदार राजाच्या मागणी नुसार मी स्थानिकच असल्याने कोणत्याही परिस्थितीत विजय हा आमचाच होईल असेही लाड यांनी सांगितले.
▪️आज जरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवार देण्यात आला असला तरी काही वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींशी चर्चा होवून ते सुद्धा जनतेतून होत असला आक्रोश पाहून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास अविनाश लाड यांनी सांगून गेली १५ वर्षे मतदारांच्या बोकांडी चिकटलेले हे पार्सल यावेळी मतदारच उचकटून टाकून रत्नागिरीत पाठवतील असा आशावाद ही शेवटी व्यक्त केला
▪️यावेळी काँग्रेसचे युवा नेते व माजी जि. प. सदस्य दिलीप बोथले यांनी सुद्धा काँग्रेस पक्ष. कुणबी समाजासह विविध समाज बांधव आमच्या सोबत येत असून अविनाश लाड यांच्या पाठीशी ठाम उभे राहून दिवस रात्र एक करून विजय संपादन करू, असेही त्यांनी सांगितले.