संगमेश्वर – संगमेश्वर रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कोकणातील बारा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, त्या पैकी पहिल्या टप्प्यातील आज पाच रेल्वे स्टेशनचे बांधकाम मंत्री श्री, रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री, उदय सामंत यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करणेत आले, त्यामध्ये, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर स्थानकांचा समावेश आहे.
या पैकी संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणा साठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करणेत आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. या स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हास लाभले असे अनेकांनी बोलून दाखवले.
शेकडो ग्रामस्थ आणि प्रवासी यांच्या उपस्थितीत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पालक मंत्री उदय सामंत यांनी आज बुधवार ता, 9 ऑक्टॉबर रोजी सकाळी 9 वाजता ऑनलाईन पद्धतीने संगमेश्वर स्थानकाचे लोकार्पण केले.तर भाजपाचे माजी आमदार श्री, विनय नातु यांनी संगमेश्वर रेल्वे स्थानकाचे फित कापून लोकार्पण झाल्याचे जाहीर केले.
यावेळी विनय नातु यांनी स्थानकात लावलेल्या कोकणचे भाग्यविधाते, कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे आणि अर्थ मंत्री कै,मधु दंडवते यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन त्यांना नमन केले आणि नामफालकाचे अनावरण केले. यावेळी माजी आमदार विनय नातु यांनी कोकण रेल्वेचा आतापर्यंतचा प्रवास वर्णन केला त्यामध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा, मधु दंडवते यांचा आवर्जून उल्लेख केला, कोकणातील जनतेचे कौतुक करताना संगमेश्वर स्थानक हे दोन गावाच्या मध्यवर्ती आहे, मात्र या स्थानकाच्या नावाचा वाद न होता तालुक्याचे संगमेश्वर नाव देण्यात आले, असेच आरवली रोड असेल अशी अनेक नावे लोकांच्या समंजस पणे देण्यात आली असे सांगताना जिल्हा, तालुक्यातील ग्रामस्थाना धन्यवाद दिले .
यावेळी माजी आमदार विनय नातू,यांच्या सोबत व्यासपीठावर चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव , भाजप संगमेश्वर उत्तर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, दक्षिण मंडल अध्यक्ष रूपेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, आर डी सी सी बँक संचालक राजेंद्र सुर्वे, शिवसेना संगमेश्वर उत्तर तालुका अध्यक्ष कृष्णा हरेकर, जमुरत अल्जी भाजप पदाधिकारी अभी शेट्ये, सुशांत मुळ्ये, सुधीर यशवंतराव ,मिथून निकम, अविनाश गुरव, डॉ अमित ताठरे,स्वप्निल सुर्वे, प्रशांत रानडे, भास्कर माडरकर भाजप महिला अध्यक्षा सौ शितल दिंडे, स्नेहा फाटक, कोमल रहाटे , सुमन झगडे. तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यअभियंता श्री, कांबळे आदिंची उपस्थिती लाभली.