आजच्या या स्पर्धेच्या युगात आपण सर्वच जण घड्याळ्याच्या काट्याभोवती धावत आहोत. यामुळे नेहमीच आपलं आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष होते. आणि सहाजीकच याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आपल्याला आजारपणाला सामोरे जावे लागते. कधी ऑफिसचं टार्गेट, वेगवेगळे प्रेजेंटेशन्स आपल्याला झोपू देत नाही तर कधी आपण मोबाईलच्या अती आहारी गेल्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करतो. वेळेवर न झोपणे वेळवेर न उठणे, अर्धवट झोपेचा आपल्या शरिरावर घातक परिणाम होऊ शकतो. झोप न झाल्यामुळे कित्येक वेळा आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो आणि याचा परिणाम कामावर होतो. आपण आतापर्यंत झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारे बरेच दुष्परिणाम ऐकले असतील. मात्र एका संशोधनातून जी माहिती समोर आलीय ती वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
आजची तरुण पिढी प्रचंड मोबाईलच्या आहारी गेली आहे. ते दिवसभर इतका मोबाईल पाहतात की त्यांना झोपेचंही भान राहत नाही. माणसाने विज्ञान व तंत्रज्ञान विकसित केलं ते प्रगतीसाठी मात्र आजकाल या तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे आपल्या झोपेचे चक्र बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे.मात्र तुम्ही असं करात असाल तर थांबा कारण एका संशोधनात असं समोर आलंय की फक्त एक रात्र न झोपल्याने तुमचा मेंदू दोन वर्षांनी म्हातारा होतो. विश्वास बसत नाही ना..पण हे खरं आहे. अर्धवट झोप तुम्हाला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जातो. शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागते. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉ. विश्वेश्वरन बालसुब्रमण्यन यांनी सांगितले की, कार्यक्षम राहण्यासाठी, उत्साहासाठी, भावनिक समतोलासाठी आणि एकूणच शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी झोप आवश्यक आहे. झोप स्मरणशक्तीसाठीही मोठी भूमिका बजावते त्यामुळे झोप आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी तणावमुक्त जीवनशैलीकरिता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सुंदर त्वचेपासून, पचनसंस्था, मानसिक आरोग्य, रक्तदाब असे बरेच आजार पुरेशी झोप घेतल्यामुळे दूर होतात. याकरिता पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे, मात्र या स्पर्धेच्या युगात बिघडलेल्या जीवनशैलीमुळे झोपेवर परिणाम होतो.
झोपेची वेळ ठरवून घ्या
चांगल्या झोपेसाठी योग्य वेळ निवडणे गरजेचं आहे. दररोज आपल्या झोपेची वेळ एकच ठेवा, त्यात बदल करु नका, अनेकांना झोप येत नाही, लवकर झोप लागत नाही यासारंख्या समस्या आसतात. अशा लोकांनी पुस्तक वाचायची सवय लावा. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. सोशल मीडीयाचा अतिवापर हे निद्रानाशाचे कारण ठरत असल्याचे सामोरे येत आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित 7-8 तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
झोप का मह्त्त्वाची आहे त्याची कारणं…
हृदय निरोगी रहाण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब व रक्तातील क्लोरेस्टोलशी आहे
ताणतणाव कमी होतो, त्यामुळे रक्तदाब नियमन राहतो आणि हृदयासाठी उपयुक्त ठरते.
स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली रहाते. चांगली झोप आपल्याला उत्साही तसेच सतर्क बनवते. शारीरिक आजार आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.