पनवेल:- ताईक्वांडो असोसियशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या अधिकृत संघटनेमार्फत राज्यस्तरीय सीनियर ताईकवांडो स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेला महाराष्ट्र मधुन २४ जिल्यामधून ४८० खेळाडूनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा लातुर जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड येथे २८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घेण्यात आली होती या स्पर्धे मध्ये रायगड च्या खेळाडूनी घवघवीत यश संपादन केले आहे सुवर्ण पदके -६ रौप्य पदके-४ आणि कास्य ७, अशी १७ पदके मिळवुन सांघिक दुसरा क्रमांक पटकावला या मध्ये सुवर्ण पदक विजेते खेळाडु प्रशांत घरत राकेश जाधव रुपेश माळी प्राजक्ता अंकोलेकर मुग्धा भोसले प्रशांत घरत, रौप्य – अक्षता भगत गायत्री भंडारे, रतिका अहुजा आणि संदीप प्रभु , कांस्य – दिनेश म्हात्रे ,निर्मिती दत्ता ,कार्तिका नारायण -३ ,रूपेश माळी दिनेश अनिल म्हात्रे इ. पदके मिळवुन सांघिक दुसरा क्रमांक पटकावले व बेस्ट पुमशे खेळाडु म्हणुन प्राजक्ता अंकोलेकर हिस सन्मानित करण्यात आले या स्पर्धेला प्राशिक्षक अनिल मधुकर म्हात्रे , सचिन आवळे व तेजस जगन माळी यांनी विशेष मेहनत घेतली या सर्व खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक व ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हे यश संपादन करता आले या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडु पाउंडीचरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.