
द.रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. राजेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती
सदर पक्षप्रवेश हा जिल्हा सरचिटणीस संगीताताई जाधव यांच्या माध्यमातून तालुका उपाध्यक्ष अभिजित सप्रे,यशवंत गोपाळ,महेश राऊत यांच्या सहकार्याने आणि तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनाने
पक्षप्रवेशकर्ते सुरेश केदारी यांची द. संगमेश्वर तालुक्याच्या भटके विमुक्त जातीच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति तर प्रदीप घडशी यांची ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस पदि नियुक्ती करण्यात आली
आज संगमेश्वर तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटातील साडवली आणि विविध गावातील ग्रामस्थांनी प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश उर्फ बाबू केदारी यांच्या बरोबर अनेक ग्रामस्थानी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव सह उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला.
पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे:
श्री. सुरेश (बाबू) सिताराम केदारी, श्री. प्रदीप सिताराम घडशी, सौ. प्राजक्ता प्रदीप घडशी, श्री. सुरेश कृष्णा धुमाळ, श्री. प्रशांत विजय गोपाळ, श्री. प्रमोद शांताराम बांडागळे, श्री. अमर भोपळकर, श्री. सुरेश कृष्णा धुमाळ, श्री. सागर सुरेश धुमाळ.
उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात यशस्वी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.