रत्नागिरी; भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रानभाज्या महोत्सवाला परिसरातील महिलांनी उत्तुंग प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी भाजपाच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मांदियाळी उपस्थित होती. मा. आमदार तथा रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. ऐश्वर्या जठार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
🔸यानंतर आंबेड बुद्रुक पंचक्रोशीतील नागरिकांनी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संर्वांगीण शाश्वत विकासाच्या धोरणावर विश्वास ठेऊन भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने आंबेड बु.मधील तेलीवाडी आणि आंबेकरवाडी तसेच शेजारील तळेकांटे गावातील सांडीमवाडी येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बाळासाहेब माने यांनी सर्वांचे स्वागत करताना गावाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. तर जिल्हाध्यक्ष श्री. सावंत म्हणाले, “भारतीय जनता पार्टी विकास आणि राष्ट्रवाद या दोन धोरणांचा सातत्याने पुरस्कार करत असून मागील ९ वर्षे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन देशाचा कारभार करत आहे. खऱ्या अर्थाने देशाला सुशासन देण्यात मोदीजींचे योगदान मोठे आहे. त्यामुळे यापुढील काळात मा. बाळासाहेबांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित प्रयत्न करू.”
🔸या कार्यक्रमासाठी भाजपा संगमेश्वर महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे, उपाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये. शक्तीकेंद्र प्रमुख श्री. राजेश आंबेकर, श्री. उन्मेष मुळ्ये, सौ. झगडे, सौ. आंबेकर, सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरात