
सह्याद्री मार्लेश्वर कलामंचचे निर्माते सुप्रसिद्ध शाहीर व पहाडी आवाजाचे बादशहा प्रदीप उर्फ पिंट्या भालेकर यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या कलाकारांनी आपली अप्रतिम कला केली सादर
*देवरूख-* चिपळूण येथे पार पडलेल्या नमन महोत्सवात ‘श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव’ या नमन मंडळाने नमनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनासह पारंपारीकता जपत आधुनिकतेचे दर्शन घडवले. या नमन मंडळाचे निर्माते सुप्रसिद्ध शाहीर व पहाडी आवाजाचे बादशहा प्रदीप उर्फ पिंट्या भालेकर यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या कलाकारांनी आपली कला अप्रतिमरित्या सादर करत सह्याद्री मार्लेश्वर कलामंचचा दबदबा कायम राखला आहे.
शाहीर प्रदीप उर्फ पिंट्या दादा भालेकर यांनी ४० कलाकारांचा भक्कम संच घेऊन आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रबोधनात्मक काव्यरचने सोबत मृदुंग, ढोलकी, टाळ, चखवा यांचा सुंदर संगम रसिकांना कर्णमधुर आस्वाद घेता आला. नमन कलेतील आपला हातखंडा कायम राखला. गण, गौळण, वगनाट्य अवघ्या ५० मिनिटात सादर करणारे सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव हे एकमेव नमन ठरले. रसिकांसोबत, लोककला संस्था मुंबई (कार्यक्षेत्र भारत) महासचिव शाहीर खेरटकर तसेच नमन लोककला संस्था रत्नागिरीचे उपाध्यक्ष श्री युयुत्सु आर्ते यांनी शाब्बासकीची थाप पाठीवर देत कलाकारांचे विशेष कौतुक केले.
श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंचच्या वसंत रपसे, विनायक घोटल, विश्वनाथ पेंढारी, हर्षद घोटल, संतोष पवार, सुयोग डोंगरे, अभि नटे, रविंद्र गोपाळ, विद्याधर भालेकर, राजेंद्र जाधव, शुभम तावडे, यशवंत नटे, गजानन लिंगायत, दत्ताराम साळवी, विनोद वाजे, गणेश नटे, शांताराम लिंगायत, नथुराम पवार, विघ्नेश पेंढारी, दिलीप जोशी, प्रदीप पडवळ, बापू जाधव, बाल कलाकार रूद्र भालेकर व प्रज्वल पवार यांनी अप्रतिम अभिनय सादर केला. तर प्रमिला राणे, स्वामिनी आंबेरकर, सानिका डोरलेकर, आदीती वरवटकर, अमेघा कान्हेरे या स्त्री कलाकारांनी सहभाग घेत सुंदर नृत्याविष्कार सादर केला. श्रिया भालेकर हीने कोरस साथ दिली. किबोर्ड सुनिल केदारी, ढोलकी साथ सोहम पागार, आँक्टोपॅड लक्ष्मण शिंदे, मृदूंगसाथ संदीप देवळेकर यांनी दिली.