बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे फरार अध्यक्ष आणि सचिवांना अखेर अटक…

Spread the love

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

*बदलापूर-* बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर विरोधकांकडून शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यात येत असल्याचा आरोप होत होता. अटक टाळण्यासाठी शाळेच संस्थापक अध्यक्ष व सचिवांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे ताब्यात घेण्यात आलेल्या शाळेच्या ट्रस्टींचे नाव आहे.

दोन्ही ट्रस्टींना गुन्हे अन्वेशष विभागाने ताब्यात घेतले असून त्यांना उद्या (गुरुवार) कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे.बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. बदलापूर शाळेतील चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. आता या प्रकरणातील शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे. कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला गेल्या आठवड्यात पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. मात्र या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आलेले बदलापूरमधील त्या शाळेतील दोन पदाधिकारी मात्र फरार असल्याने पोलीस प्रशासन आणि सरकारवर टीका होत होती. एन्काउंटरवर न्यायालयानेही पोलिसांना खडेबोल सुनावत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. या शाळेत चाईल्ड पोर्नेग्राफी केली जात असल्याची तक्रार आहे.  तसेत आरोपी मानवी तस्करीतही सामील असल्याचा आरोप केला आहेत आहे.

कोतवाल व आपटे या दोघांनी अटकपूर्वी जामीनासाठी हायकोर्टामध्ये अर्ज केला होता. मात्र हे प्रकरण गंभीर असल्याचे कारण देत हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. हायकोर्टानं दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना राज्य सरकार व पोलिसांना चांगलच झापलं होतं. आरोपींना अटकपूर्व जामीन मिळायची वाट पाहताय का?”, असा सवाल करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व दुसऱ्याच दिवशी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page