रत्नागिरी /प्रतिनिधी – रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत आता कुठेही मतभेद नाहीत जिल्हातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. दापोली व गुहागर मध्ये काही गैरसमज होते. मात्र आता ते गैरसमज मिटलेले असल्याने सर्व मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेत असल्याने युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा करतील अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दीली.
रत्नागिरीत बाळ मानें यांनी भाजपा सोडून विचारांशी गद्दारी केली असल्याने भाजपा त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगितले. तसेच या विधानसभेत राज्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत येणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत
दापोली व गुहागरमध्ये महायुतीत कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असून कोणतीही नाराजी नाही. रत्नागिरीत बाळ मानेंनी भाजपाला रामराम केला असला तरी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते महायुती सोबत राहिले आहेत. माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून विचारांशी गद्दारी केलेली आहे. त्यांना भाजपाची कदापी साथ मिळणार नाही.