*पॅरिस आलिम्पिक 2024 मध्ये आज सहाव्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळालंय….*
*पॅरिस :* पॅरिस आलिम्पिक 2024 मध्ये आज सहाव्या दिवशी भारताला आणखी एक पदक मिळालंय. कोल्हापुरचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातलतीय. या आलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलंय. यापुर्वी मनु भाकरनं एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली.
*स्वप्निलची अंतिम फेरीतील कामगिरी –*
नीलिंग (पहली सीरीज)- 9.6, 10.4, 10.3, 10.5, 10.0, एकूण : 50.8 गुण
नीलिंग (दूसरी सीरीज)- 10.1, 9.9, 10.3, 10.5, 10.1, एकूण : 51.9 गुण
नीलिंग (तीसरी सीरीज)- 9.7, 10.3, 10.8, 10.4, 10.0, एकूण : 51.6 गुण
प्रोन (पहली सीरीज)- 10.5, 10.6, 10.5, 10.6, 10.5, एकूण : 52.7 गुण
प्रोन (दूसरी सीरीज)- 10.8, 10.2, 10.5, 10.4, 10.3, एकूण : 52.2 गुण
प्रोन (तीसरी सीरीज)- 10.5, 10.4, 10.4, 10.2, 10.4, एकूण : 51.9 गुण
स्टैंडिंग (पहली सीरीज)- 9.5, 10.7, 10.3, 10.6, 10.0, एकूण : 51.1 गुण
स्टैंडिंग (दूसरी सीरीज)- 10.6, 10.3, 9.1, 10.1, 10.3, एकूण : 50.4 गुण
उर्वरित चार शॉट्स : 10.5, 9.4, 9.9, 10.0