पणजीत 25 मार्चपासून शिगमोत्सवाची धूम; स्मार्ट सिटीच्या कामामुळे ‘या’ मार्गावरून निघणार मिरवणूक….

Spread the love

यंदा प्रथमच 18 जून ऐवजी बांदोडकर मार्गावरून चित्ररथ मिरवणूक…

▪️पणजी शिगमोत्सव समितीतर्फे 25 ते 31 मार्चपर्यंत आझाद मैदानावर मराठी सुगमसंगीत,नाटक, हिंदी वाद्यवृंद, लावणी अशा विविधरंगी कार्यक्रमांसाह यंदाचा शिगमोत्सव साजरा होणार आहे.

▪️पणजीत स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने यावर्षी प्रथमच 18 जून मार्ग सोडून दयानंद बांदोडकर मार्गावरून चित्ररथ, रोमटामेळ,लोकनृत्य मिरवणूक निघणार आहे.

▪️जुन्या सचिवालयाकडून संध्याकाळी 5 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होईल व रात्री 10 पूर्वी कांपाल येथे ईएसजी कडे संपेल. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत पणजी शिगमोत्सवाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला.

▪️यावेळी कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक व सचिव शांताराम नाईक उपस्थित होते.
श्रीनिवास धेंपे म्हणाले की,गावा गावात शिगमोत्सव साजरा होत होता.

▪️1989 साली संस्कृती प्रेमीचा एक गट उद्योगपती कै वसंतराव धेंपे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र येऊन त्यांनी पणजी शिगमोत्सव समिती स्थापन केली आणि पणजीत चित्ररथ मिरवणूक घडवून आणली.

▪️त्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पुढे त्याला राज्योत्सवाचे रूप आले. यंदा पणजी शिग्मोत्सवाचे 36 वे वर्ष आहे आणि आमची समिती एकदिलाने, एक मनाने उत्सव साजरा करत आली आहे.

🔹️बक्षिसांच्या रकमेत वाढ:-

▪️यंदा चित्ररथ, रोमटामेळ स्पर्धकांसाठी बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पर्यटन खात्याच्या सौजन्याने यंदा साडे दहा लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.

▪️चित्ररथासाठी प्रथम 75 हजार रुपये, द्वितीय 60 हजार रुपये, तृतीय 50 हजार रुपये, चौथे 45 व पाचवे 40 हजार अशी बक्षिसे असतील.

▪️धेंपे उद्योग समूहातर्फे प्रथम तीन क्रमांकाना तसेंच रोमटामेळ विजेत्यांना अनुक्रमे 15, 10 व 10 हजारांची बक्षिसे देण्यात येतील.

▪️रोमटामेळ स्पर्धेसाठी प्रथम 75 हजार, द्वितीय 50 हजार, तृतीय 40 हजार, चौथे 30 हजार व पाचवे 20 हजार अशी बक्षिसे आहेत. शिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धेसाठी वेगळी बक्षिसे आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page