चिपळूण तालुक्यातील दहिवली रस्त्यावर घरफोडी करणाऱ्याच्या सावर्डे पोलिसांनी अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या.

Spread the love

घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा सावर्डे पोलिसांकडून २४ तासात छडा, आरोपींकडून मुद्देमाल जप्त

चिपळूण : तालुक्यातील दहिवली रस्त्यावर असलेल्या आशियाना अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा अवघ्या २४ तासात छडा लावून सावर्डे पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा यासिन काद्री (२३, सावर्डे, अडरेकर मोहल्ला) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडे रोख रक्कमसह यापूर्वी झालेल्या घरफोडीचा मुद्देमाल देखील सापडला आहे. त्यामुळे अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चिपळूण तालुक्यातील दहिवली रस्त्यावर आशियाना अपार्टमेंट नावाचे गृहसंकुल असून त्यामध्ये रोशनी अडरेकर यांची सदनिका आहे. अडरेकर कुटुंबासह मंगळवारी एका लग्न सोहळ्यासाठी गेलेले असतानाच चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत २५ हजार रुपये लंपास केले होते. याबाबत रोशनी अडरेकर यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच सावर्डे पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनीष कांबळे, सहायक पोलिस फौजदार प्रदीप गमरे, अभिषेक बेलवलकर हे या घरफोडीचा कसून तपास करत असतानाच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व सिडीआर सारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतली. त्यामुळे मुस्तफा यासीन काद्री यानेच चोरी केल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन बुधवारी सकाळी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

तसेच यापूर्वी मौजे.दहिवली बुद्रुक येथील रहिवासी निवृत्त पोलिस अधिकारी श्री.चंद्रकांत गोविंद घाग यांच्या घरातून झालेल्या चोरीतील पोलिस खात्याची तलवार, बॅटरी व अन्य साहित्य देखील आढळून आले. तसेच घरातील कपाटात २० हुन अधिक घड्याळ व चोरीसाठी वापरण्यात येणारे कटावणी तसेच अन्य साहित्य देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व मुद्देमालासह मुस्तफा यासिन काद्री याला ताब्यात घेऊन अटक केली.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page