छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं उधळणार गुलाल?; स्पष्ट बहुमताचे संकेत..

Spread the love

पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.

पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. याचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. पण या निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल आता समोर आले आहेत.

Chhattisgarh exit Polls Result विविध सर्व्हेमधून काही अपेक्षित तर काही धक्कादायक संभाव्य निकाल समोर आले आहेत. त्यानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता राखणार असल्याचं चित्र आहे.

▪️छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागा आहेत. त्यापैकी ४५ हा बहुमताचा आकडा आहे.

▪️इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया
काँग्रेस छत्तीसगडमध्ये बहुमताचा आकडा पार करणार असल्याचं चित्र आहे. या राज्यात काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील असा इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर भाजपला ३६ ते ४६ जागा मिळतील. तसेच इतर पक्षांकडं १ ते ५ जागा जातील असंही हे एक्झिट पोल सांगत आहेत.

▪️इंडिया टीव्ही-सीएनएक्स
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला छत्तीसगडमध्ये ४६ ते ५६ जागा मिळतील. तर भाजपला ३०-४० जागा तसेच इतर पक्षांना ३-५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

▪️एबीपी-सीव्होटर
एबीपी-सीवोटरच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला ४१ ते ५३ जागा तर भाजपला ३६ ते ४८ अन्य पक्षांना ०- ४ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

▪️न्यूज २४ – टुडे चाणक्य
या संस्थांच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला छत्तीसगडमध्ये ५७ जागा मिळतील. भाजपला ३३ तर अन्य पक्षांना ० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

▪️रिपब्लिक-मॅट्रिज
रिपब्लिक-मॅट्रिजच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला ४४ ते ५२ जागा तर भाजपला ३४ ते ४२ जागा आणि अन्य पक्षांना ०-२ जागांवर समाधान मानवं लागेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page