कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकात परप्रांतीय वडापाव विक्रेत्याकडून गलिच्छ प्रकार उघडकीस

Spread the love

चिपळूण :- विक्रीसाठीच्या वडापावावर चक्क पाय ठेवून झोपी गेलेल्या विक्रेत्याचे चिपळूण रेल्वे स्थानकातील छायाचित्र सोमवारी सोशल मिडियावर व्हायरल झाले . मंगळवारी रेल्वे प्रशासनाने संबंधित वडापाव सेंटरवर ५ हजारांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पुढे येत आहे .
चिपळूण रेल्वेस्थानकात सोमवारी एक परप्रांतीय विक्रेता चक्क विक्रीसाठीच्या वडापावावर पाय ठेवून गाढ झोपी गेल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एका प्रवाशाने त्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल केले . प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्याचे छायाचित्रे पाहून सर्वत्र संताप व्यक्त झाला. कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानकावरील ज्या फलाटावरील वडापाव सेंटरमधून संबंधित विक्रेत्याने हे वडापाव विक्रीसाठी आणले होते , त्या सेंटर चालकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती पुढे येत आहे .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page