आत्तापर्यंत महत्त्वाच्या बातम्या…

Spread the love

🟡 पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; २७ जूनची परिस्थिती “जैसे थे ठेवा”, ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींची मागणी; पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी कशाला? अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना आमदार मतदान कसे करणार? सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल

🟡 हा केवळ पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न, पक्षफुटीचा संबंध नाही; सत्ता संघर्षाची सुनावणी याच आठवड्यात संपणार

🟡 अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारची सकारात्मक चर्चा, मानधनात १५०० रुपयांची वाढ, मोबाईल मिळणार आणि पेन्शन योजना लागू

🟡 कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या नऊ शिक्षकांवर गुन्हा दाखल, केडगावच्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयातील प्रकार

🟡 दहशतवाद्यांचा कट उधळला? NIA ने अलर्ट केलेला संशयित दहशतवादी इंदूर पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा, चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल

🟡 मुंबई महिलांसाठी सुरक्षित नाही! नूडल्सचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; ४२ वर्षीय शेजारी अटकेत; पुण्यात तरुणीला गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले १६ लाख

🟡 कृषी आणि पालकमंत्री दादा भुसेंची मध्यस्थी, लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु, दिलासा मिळणार का?, पाच क्विंटल कांदा विक्रीनंतर शेतकऱ्याला केवळ १८ रुपये मिळणं ही गंभीर बाब : छगन भुजबळ; सभागृहात कांदा प्रश्नांवरुन भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी, नाशिकचे दोन्ही आमदार भिडले!

🟡 वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा, ५० व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट

🟡 अवघ्या एका धावेने सामना जिंकत न्यूझीलंडने रचला इतिहास, फॉलोऑन मिळाल्यानंतरही विजय मिळवणारा जगातील तिसरा संघ

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page