महत्वाची बातमी; चिपळूण, पनवेल तसेच पनवेल – रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन धावणार

Spread the love

डिजिटल दबाव वृत्त

रत्नागिरी :- कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने चिपळूण – पनवेल तसेच पनवेल – रत्नागिरी अशी ८ डब्यांची संपूर्ण अनारक्षित असणारी मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे . ही गाडी दि . ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पासून फक्त रविवारी धावणार आहे .
यासंदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५७ चिपळूण येथून दुपारी ३ वाजून २५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल . याचबराबरोबर ०११५७ पनवेल येथून रात्री ८ वा . २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचणार आहे . चिपळूण- पनवेल मेमू गाडी अंजनी , खेड , कळंबणी बुद्रुक , दिवाणखवटी , विन्हेरे , करंजाडी , सापे वामणे , वीर , गोरेगाव रोड , माणगाव , इंदापूर , कोलाड , रोहा , निडी , नागोठणे , कासू , पेण , हमरापूर , जिते , आपटा , रसायनी आणि सोमटणे या स्थानकांवर थांबणार आहे . याचबरोबर पनवेल- रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीला सोमटणे , रसायनी , आपटा , जिते , हमरापूर , पेण , कासू , नागोठणे , निडी , रोहा , कोलाड , इंदापूर , माणगाव , गोरेगाव रोड , वीर , सापे वामणे , करंजाडी , विन्हेरे , दिवाणखवटी , कळंबणी बुद्रुक , खेड , अंजनी , चिपळूण , सावर्डा , आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबणार आहे . दरम्यान , अनारक्षित गाडीच्या विशेष फेऱ्यांमध्ये प्रवाशांना दिलासा मिळाला आहे .

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page