
मुंबई गोवा महामार्गावरील आरवली पूल वाहतुकीसाठी बंद
संगमेश्वर ; रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे चिपळूण खेड परिसरात पुराचे पाणी आले आहे दापोलीतही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे मुंबई गोवा महामार्गावरील आरवली पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली आहे
गडनदीने धोकादायक पाण्याची पातळी गाठली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
संगमेश्वर तहसीलदार आणि संगमेश्वर पोलीस घटनास्थळी
पावसाचा जोर वाढू लागल्याने संगमेश्वर वासीयांची चिंता वाढली आहे