
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ ) दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र बुधवारी (आजपासून) सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रांची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे
