
*जालना/ मुंबई-* मनोज जरांगे आणि फडणवीस यांचे भांडण हे नाटकं वाटते, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वासच बसत नाही. हे आरोप माझ्यासाठी शॉकिंग देणारे आहेत. त्यावर मी काही जास्त बोलणार नाही, त्या आरोपांना मी उत्तर देखील देणार नाही.
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाची उन्नती करायची आहे. माझा समाज मोठा होऊ नये म्हणून अनेक लोकांचे स्वप्न आहे. देशात अखंडपणे चालणारे आंदोलन हे मराठा समाजाचे आंदोलन आहे. 29 ऑगस्ट रोजी समाजाची बैठक ठरवली आहे. कोटीने मराठा समाजा संपला नाही पाहिजे, मी वैयक्तिक संपलो तरी चालेल, असे ते म्हणाले.
*गरीब समाजबांधवांनी समजून घेतले पाहिजे…*
जरांगे पाटील म्हणाले की, धनगर, मराठा, मुस्लिम, दलित, लिंगायत यांना मोठं होण्याची ही एकच संधी आहे. खूप वर्षे व दशकानंतर ही लाट उठून आलेली आहे. आता गोरगरीबाने देणारं बनायला पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची देखील मागणी आहे. परंतु हे कोणाला होऊ द्यायचे नाही, हे देखील समजून घेतले पाहिजे. जे ज्या समाजाचे नेतृत्व करतात, त्यांनाच ते होऊ द्यायचे नाही. गोरगरीब समाजाने हे देखील समजून घेतले पाहिजे. हे विचार करण्याची गोष्ट आहे.
*पंकजा मुंडेविषयी बोलणार नाही..*
मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही असं म्हणत आरक्षणाला कोण विरोध करत हे सामान्य जनतेने समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे के म्हणाले. पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले असून जरांगे यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असा टोला लगावत कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आज त्या बीडमध्ये त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
*प्रकाश आंबेडकरांनी काय केले होते आरोप?*
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर नुकताच जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला होता. सगेसोयरेच्या मागणीला विरोध करत मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीका त्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचे भांडण नकली असल्याचा आरोप त्यांनी केला होता.