नेरळ- सुमित क्षीरसागर
कर्जत कल्याण राज्यमार्गावरील नेरळ येथे मोटारसायकल आणि कार मध्ये भीषण अपघात घडला.कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार समोरील मोटारसायकलला जावून धडकली आहे.यामध्ये मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या सोबत असलेली त्याची पत्नी हि देखील जखमी झाल्याचे सांगण्यात आलं.घटनास्थळी नेरळ पोलीस व ग्रामस्थांनी एकाच गर्दी केली होती.
कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ दिशे कडून कर्जत दिशेने निघालेली ओमनी कार MH 46 Z 8512 ह्या कार ने पुढे चालणाऱ्या मोटारसायकला मागून धडक दिली.तुलसी इस्टेट येथे हा अपघात घडला.दरम्यान मोटारसायकल स्वार असलेले पती पत्नी हे खाली पडून गंभीर जखमी झालेत,यामध्ये मोटारसायकल चालकाच्या पायाला कारचा जबर मार बसल्याने पाय निकामी झाल्याचे सांगण्यात आलं.आज शनिवार असल्याने माथेरान हुतात्मा चौकात नेहमी प्रमाणे पोलीस बंदोबस्त असल्याने तात्काळ नेरळ पोलीस हजार झाले तर ग्रामस्थांची देखील एकाच गर्दी जमली होती.यावेळी जखमींना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिट येथे उपचारासाठी हलवण्यात आले तर कार चालक घाबरून सुरुवातीला पळून गेल्याचे देखील सांगण्यात आले होते.
एकूणच ह्या परिसरात आठवड्या भरात दोन अपघात घडले असून या अपघातात थोडक्यात मनुष्य हानी होता टळली आहे.एका पत्रकाराच्या कारला एका पिकअप टेंम्पो जावून धडकला होता.सुदैवाने कार मधील चालकाने कार फिरवल्याने पिकअप टेंम्पो चालक हा कार चालकाचा बाजूला ठोकला यात कारचे नुकसान झाले परंतु यातील लहान मुलगा बचावला.
सद्या या परिसरात अनेक अपघात घडत आहेत,वनविभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे येथील दोन मार्ग रस्ता हा सिंगल मार्गे झाल्याने अपघात घडत आहेत,परिसरत शाळा कॉलेज आहे,पुढे पेट्रोल पंप देखील आहे त्यामुळे शासनाने यावर तात्काळ उपाय करीन रस्त्याची रुंदीकरण करणे आवश्यक आहे.आता पर्यंत येथे अनेकांचे अपघात घडले तर काहींना आपला प्राण गमवावे लागले आहे.
त्यामुळे आता तरी प्रशासन जागे होणार का की अपघाताची मालिका सुरू राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.