दिनांक 10 ऑक्टोबर 2023 मंगळवार रोजीचे राशिभविष्य, कोणत्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण जनशक्तीच्या दबाव मध्ये या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 10 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

मेष: 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. विघातक विचार, कृती व नियोजन ह्यापासून दूर राहावे. पोटदुखीचा त्रास संभवतो. शक्यतो आज प्रवास टाळावा. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. संततीसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. अचानकपणे वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आर्थिक बाबतीत काळजी घेण्याची गरज भासेल.

कर्क :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अवैध बाबीं पासून दूर राहावे. आज खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. बोलणे – वागणे संयमित ठेवावे लागेल. रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अचानकपणे खर्च वाढतील. शक्यतो वाद व संघर्ष ह्यापासून दूर राहावे.

तूळ : 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल.

वृश्चिक : 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळे आनंदित व्हाल.

धनू :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. वरिष्ठांशी संघर्ष संभवतो. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी दोन हात करावे लागतील.

मकर : 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. भागीदारांशी मतभेद संभवतात. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.

कुंभ :10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास – सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. वाहनसुख मिळेल.

मीन : 10 ऑक्टोबर, 2023 च्या दिवशी आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरून एखादी चांगली बातमी मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page