राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने केली आहे.
राज्यात थंडीत प्रचंड वाढ झाली आहे. हाड गोठवण्याऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. थंडीमुळे हाडे दवबिंदू देखील गोठली आहे. पुढील काही दिवस थंडीत थोडी वाढ होऊन त्यानंतर तापमानात हळू हळू वाढ होणार आहे. राज्यात बुधवारी सवरधिक कमी तापमान वाशिम जिल्ह्यात नोंदवले गेले. या ठिकाणी ५.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त अहिल्यानगर येथे ७.४ तर पुण्यात ८.९, नाशिकमध्ये ९ अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढून आज एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र त्याच भागात तयार झाले आहे. हे क्षेत्र उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यापुढील २४ तासात ते आंध्रप्रदेश किनारपट्टीच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. याच परिमाण राज्याच्या हवामानावर होणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस चारही उपविभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान पुढील दोन दिवस तीन ते चार डिग्री सेल्सियस ने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, फारसा बदल होणार नाही.
पुणे व परिसरात आज आकाश मुख्यता निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर उद्या २० तारखेला आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून धुके पडण्याची शक्यता आहे. पुण्यात रात्री आणि पहाटेच्या सुमारास प्रचंड थंडी पडत आहे. पुण्यात बुधवारी ८.९
उत्तरेकडील राज्यातील थंडीच्या लाटेचा राज्याच्या हवामानावर परिणाम…
उत्तरेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. काही ठिकाणचा पारा हा शुन्याखाली गेला आहे. यामुळे राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी वाढ होणार आहे.
विदर्भात वाशिम सर्वाधिक थंड…
विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. तर उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. बुधवारी वाशिम जिल्ह्यात ६.६ तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावात जिल्ह्यात ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश जिल्ह्यात तापमान हे १० च्या आसपास होते. नांदेडमध्ये ८.९ तर नाशिक, बारामती, उद्गीर, नागपूर जिल्ह्यात ९ अंशांवर तापमान होतं.
महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकवर दवबिंदू गोठले…
महाबळेश्वरमध्ये देखील थंडीचा कडका वाढला आहे. परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमान मोठी घट झाल्याने येथील दवबिंदू गोठले होते.