किल्ले गुमतारावर ३५ फुट उंच भगवा ध्वजारोहन सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभागाचा उपक्रम

Spread the love

ठाणे : निलेश घाग

जिल्ह्यातील ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग गेल्या नऊ वर्षापासून दुर्ग संवर्धनाचे अविरत कार्य करत आहे.इतिहास संकलन,पायवाटा दुरुस्ती,पाण्याचे टाके स्वच्छता,जमितीन गाडलेला प्रवेशद्वार संवर्धन,तटबंदी-बुरुज संवर्धन,गडदेवी मंदिर छत डागडुजी,दुगाड घोटवट मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक व माहिती फलक लावणे,गडावर सूचना इतिहास फलक व स्थळ दर्शक फलक लावणे तसेच अनेक स्वच्छता मोहिमा यशस्वी करणे असे कार्य नियमित सुरु आहे.अशी माहिती भिवंडी विभाग सदस्य अक्षय पाटील,सागर पाटील आणि रोशन पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेकाचे अवचित्त साधून किल्याच्या बाले किल्ल्यावर कायमस्वरूपी ३५ फुट उंच परम पवित्र भगवा ध्वज लावण्यात आला. जवळपास २०० किलो वजनी साहित्य तीन तास उंच व अवघड टप्प्यातली गडचढाई करून बालेकिल्ल्यावर नेण्यात आले. रांगोळी व फुलांची सजावट करून ध्वजाची पूजा करण्यात आली.या कार्यासाठी स्थानिक दुर्गसेवकांनी स्ववर्गणीतून साहित्य व नियोजनाची व्यवस्था केली होती.असे राकेश पाटील यांनी सांगितेल.सदर मोहिमेस आ.संजय केळकर सर (कार्यअध्यक्ष स.प्र.)आणि गणेश रघुविर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मोहिमेस श्री.प्रशांत सोगम,श्री.मनोज कोचर,श्री.विनल दहेनकर,महेश जाधव(खेड),सुभदा पुरव(गिर्यारोहक), श्री.नितीन जोरे,सतीश गंजी या मान्यवारांची उपस्थिती लाभली.कल्पेश पाटील,गिरीश कासकर,मोहन सातपुते यांनी स्थानिक नियोजन केले.संस्थेच्या मुंबई,वसई विरार,सिंधुदुर्ग,अंबरनाथ,ठाणे,पनवेल, रायगड,रत्नागिरी,कोल्हापूर या विभागांची उपस्थिती लाभली त्यांचे भिवंडी विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
:-अक्षय पाटील,भिवंडी विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

चला तर पाहूया गडकिल्ल्यांचा इतिहास

गुमतारा किल्ला
किल्ले गुमतारा (घोटवडा किल्ला,दुगाड किल्ला)


किल्ल्याची श्रेणी : मध्यम/उंची : १९४९ फुट
वसई वरून वज्रेश्वरी येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक उत्तुंग डोंगर आहे.या डोंगरावर शिवकालीन इतिहास जाणारा एक दुर्लक्षित किल्ला आहे.या किल्यास गुमतारा किल्ला,घोटवडचा किल्ला,दुगाड किल्ला अशी नामवली आहे.गडाच्या माथ्यावर पोहचण्यास तीन तास लागतात.गुमतारा किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल,कामनदुर्ग,भिवंडी प्रांत हा परिसर दिसतो व त्या काळी या परिसरावर लक्ष ठेवता आले आसावे. पायथ्याशी असलेल्या दुगाड गावामुळे यांस वडगड नाव पडले असावे.असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.या  परिसरात गहन जंगल आहे.आजूबाजूच्या परीसरामध्ये जवळपास दोन  किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिर आहे.तसेच घोटवड गाव आणि दुगाड गाव  हि पायथ्याची गावे आहेत.

भूगोल: भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला गहन जंगलाच्या मधेच आहे १९४९ फुट उंची वरून दिसणारे  वातावरण हे फार निसर्ग रम्य आहे या किल्ल्यावर नीरनिराळ्या प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात .किल्ल्यावर दगडात कोरलेले ७ टाक्या आहेत त्याचीतील एका टाकीची साधारण खोली हि ५ ते ६ फुट आहेत.इतर टाक्या बुजल्या आहेत.पुढे खालच्या बुरजा जवळ  दोन मोठ्या दगडांच्या मधोमध बारामहिने गोड पाण्याच्या नैसर्गिक झरा हि आहे.(१८ जुलै २०१५ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान ने राबवलेल्या दुर्ग दर्शन मोहिमेत त्यांनी झारयाची माहित काढली आहे)

इतिहास:
हा किल्ला फारच दुर्लक्षित असल्याने सहसा पर्यटक इथे जाण्यासाठी पाठ करतात.हा किल्ला पंधरा मैल दक्षिणेस टकमक आणि दुगाड गावा जवळ आहे.पण किल्याला इतिहास आहे.ऐतिहासिक संदर्भातील नोंदणी प्रमाणे २४ मार्च १७३७ गुरुवारी मराठ्यांची टोळी माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर निघाली व पहाटेच्या घोटवाडाच्या अर्थातच गुमतारा दुगाडच्या रानात आली तो सबंध दिवस त्यांनी रानातच घालवला.दिवस उन्हाचे होते व प्रदेश अतिशय गर्मीचा होता त्यामुळे त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार होती.त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन दोन चार लोक हि मेली.
शिवकालीन संदर्भां पासून ते पेश्वेकाळातील संदर्भात गुमतारा किल्ला  बरेच वेळा वेवगाऊ झाल्याची नोंद आहे.सध्या गडावर राबता न राहिल्याने वाटा सापडणे कठीणच किल्ल्यावर दुर्ग यात्रींचा फारसा सहवास नसल्याने हा किल्ला दुर्लक्षित आहे किल्यावरील दुर्ग अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.१८१८ मध्ये किल्ल्यावर बांधकाम झाल्याचे संदर्भ ठाणे ग्याझेट मध्ये उपलब्ध आहेत

तुम्ही या ठिकाणाला जरूर भेट द्या : अक्षय पाटील,भिवंडी विभाग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान


भिवली गावा पासून गेल्यास उसगावचे धरण लागते हे धरण पाण्याने भरलेले नसल्यास धरणातून जाता येते (अन्यथा धरणाला वळसा मारून सरळ पुढे जावे) पुढे गेल्यास  एक लहान धबधबा लागतो आणि त्याला लागून एक पायवाट धरून वर जाता येते.जवळपास १तासच्या  नंतर एक माची येते आणि पुढे आणखी  दोन माच्या लागतात. तीन तासानंतर किल्ल्याच्या  सर्वात उंच भागावर बालेकिल्लावर पोहचतो.तेथून पुढे चालत गेल्यास ८  मिनिटात उजव्या हाताच्या वळणावर पाण्याच्या ६ टाके कोरलेले आहेत.त्यात ६ पैकी फक्त एकाच टाकीत पाणी आहे पण हे पाणी सध्या जराशे पिण्या योग्य नाही या टाकीची खोली हि ५ फुट असून ५ बाय ८ एवढी लांब रुंद आहे.इतर ५ टाक्या ह्या मातीने बुजल्या आहेत.त्याच्यापुढे एक आणखी एक कोरीव टाकी लागते एकूण ७ टाक्या आहेत.एका इंग्रज कालीन घराचे भग्न अवशेषस असावेत असे वाटते व हे अवशेष अंदाजे १२  बाय १८ एवढ्या लांबी रुंदीत पसरले आहे त्याच्या डाव्या हाताला खाली गोमुखी  दरवाजा आहे त्याचे दोन्ही बुरुज(उंची २५ ते ३०फुट) पडक्या स्थितीत आहेत. दरवाज्याचा उंबरठा तेवढा शिल्लक आहे किल्ल्याची तटबंदी हि कातली दगडात कोरीव काम करून उभी केलेली आहे आणि दुर्दैव्य असे की ही तटबंदी आणि बुरुजाचे दगड हे खाली पडून जंगलात आस्थावेस्थ पडलेले आहेत.हे दगड त्रिकोणी आकाराचे आहेत.तसेच उजव्या बाजूला वर जंगल आहे यात काहीहि अवशेष नाहीत. पुढे सरळ चालत गेल्यास एक सुस्थित असलेला बुरुज (उंची साधारण ३० फुट) त्याच्या खालच्या बाजूने उतरून मोठ मोठ्या दगडांच्या मधून परतीच्या प्रवासाच्यावेळी मधेच दोन मोठ्या दगडांच्या मध्ये एक लहान गोड पाण्याच्या झरा लागतो तेथे बाराही महिने पाणी उपलब्ध असते.

जाहिरात:-

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page