लग्नातील अनिष्ट प्रथा बंद……
सावर्डे; लग्न समारंभ अशाप्रकारचे हे सोहळे देखील अत्यंत साधे पणाने करण्याचे ठरविण्यात आले. यातून होणाऱ्या बचतीचा
पैसा नवदाम्पत्याच्या शिक्षण अथवा संसारासाठी वापरावा असेही यावेळी ठरविण्यात आले. दहिवली गावातील ७० टक्के कुणबी समाज
• असलेल्या गावाने लग्न समारंभात दारु, ताडी, माडी, कपड्याचे भांड्याचे मान-पान, मांसाहारी भोजन, डी जे आदी अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्याचा ठराव सर्व दहिवली गावचे सन्माननीय ग्रामस्थ युवा मंडळ व महिला मंडळ यांची संयुक्त बैठक आयोजित करून कुणबी युवा मंचाच्या प्रबोधनातून समाज
परिवर्तन घडविण्याबाबत निर्णय घेतला आहे यापुढे दहिवली गावातील सर्व विवाह सोहळे अत्यंत साधेपणे होतील. या वेळी कुणबी समाज का मागे पडला? यावर चिंतन करण्यात आले.
त्यात लग्न सोहळ्यातील भरमसाठ उधळपट्टीमुळेच अनेक कुटुंबे दिवसेंदिवस कर्जाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट झाले.
पसंती व साखरपुडा हा कार्यक्रम एकाच दिवशी दुपारच्या वेळेस उरकने, लग्न समारंभात बस्था हा प्रकार कायम स्वरूपी बंद भेटायला येणाऱ्या प्रत्येक वक्तीला पान-सुपारी किंवा नारळ देणे.
हळदी समारंभात शुद्ध शाकाहारी जेवण बनवणे, मटण, चिकन, व दारू हे प्रकार कायम स्वरूपी बंद. स्टीलच्या भांडयांचा आहेर देणे व घेणे बंद. समाजात कुणाचे लग्न करायचे म्हटले की वधू-
वर पक्षाच्या कुटुंबियाचे कंबरडेच मोडते.वधूवराला पहायला जाणे, मांडव समारंभ, लग्न असा २-३ दिवसांचा कार्यक्रम असतो. खाणाऱ्या-पिणाऱ्यांची चांगलीच चंगळ असते. मांसाहार बेताशिवाय विवाह पूर्णच होत नाही. याशिवाय तळीरामांचा घसा ओला करण्यासाठी विशेष सोय करावी लागते. त्यासाठी ताडी, माडी याचा वापर होतो. त्याच्या प्राशनाने लग्नात वाद-विवाद, भांडणे या मुळे विघ्ने येतात. लग्न कार्यात नातेवाईकांचा मानपान, आहेर करताकरता कुटुंब कर्जाच्या विळख्यात सापडतात. हे ओळखून हा निर्णय घेतला गेला.
कुणबी समाजात लग्नाच्या अवास्तव खर्चामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या खाईत ओढली जात आहेत. त्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीच्या शिक्षणावर होतो. महिलावर्ग व तरुणांनी याची दखल घेऊन हे नवे पाऊल टाकले आहे.
जाहिरात