एअर इंडियाच्या या विमानातून १३९ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. विमानांची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. या विमानाने जयपूर विमानतळावरून उड्डाण केल्याचे माहिती समोर आली आहे.
अयोध्या विमानतळावर हाय अलर्ट; ‘या’ विमानाला मिळाली बॉम्बने उडवून देण्याची धमकी, कसून तपासणी सुरू
नवी दिल्ली: देशभरात अफवांचे जाळे फोफावताना दिसत आहे. शाळा, हॉस्पिटल्स आणि विमाने आशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या सातत्याने सुरक्षा यंत्रणेला येत आहेत. दरम्यान अशीच एक घटना आता एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली. त्यानंतर अयोध्येत हाय अलर्ट देण्यात आला आहे. विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या या ठिकाणी धमकी प्राप्त झालेल्या विमानाचे इमरजन्सी लॅडींग करण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या या विमानातून १३९ प्रवासी प्रवास करत होते. या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर या विमानाचे इमरजन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. विमानांची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जात आहे. या विमानाने जयपूर विमानतळावरून उड्डाण केल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान बॉम्बने उडवून देण्याची धमकी केवळ अफवा असल्याचे देखील म्हटले जात आहे.
विमानाची संपूर्ण तपासणी केली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संशयास्पद वस्तु आढळून आली नाही. तसेच बॉम्ब देखील आढळून आला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. अफवा असल्याचे समजताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानालाही धोका…
याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. सध्या शोध सुरू आहे. त्यानंतर विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा विमानाची कसून चौकशी करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बचा धोका लक्षात घेऊन दिल्लीकडे वळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमान सध्या IGI विमानतळावर ग्राउंड केले आहे आणि विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 2 वाजता उड्डाण केले. विमान न्यूयॉर्कला जात होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला बॉम्बची धमकी मिळाली, त्यानंतर ते दिल्लीकडे वळवण्यात आले.