सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवेचा…
दिवा : प्रतिनिधी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दिवा महिला उपशहर प्रमुख योगिता हेमंत नाईक व सुभाष भोईर यांचे खंदे समर्थक हेमंत नाईक यांनी आपल्या कोळी-आगरी समूहाच्या पारंपरिक पोशाखात, नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला नारळ अर्पण करण्याची परंपरा आगरी कोळी समाजाची आहे. त्यानंतर मच्छीमार समुद्रात मासेमारीला सुरुवात करतो.ही परंपरा गेले कित्येक वर्षे जोपासली जातेय. या सणानिमित्त नारळ लढवण्याच्या स्पर्धा देखील ठिकठिकाणी घेतल्या जातात, नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून नाईक कुटुंब आणि परिवार यांनी कुलदैवत आई एकविरा मातेला नमन करून दर्या सागराला “श्रीफळ” अर्पण करत आगरी कोळी मच्छीमार बांधवांची रक्षा कर आणि त्यांच्या व्यवसायात भरभरून यश मिळो अशी प्रार्थना करुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी ह्या वेळी आगरी कोळी बांधव व नाईक कुटुंब उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात