
दिवा (प्रतिनिधी): दिवा परिसरातील खर्डीगाव येथे रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत अग्निशमन दलातील जवानाचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.मृत जवानाचे नाव उत्सव अशोक पाटील (वय २८,रा.दातीवली गाव,दिवा) असे असून,ते अत्यंत तत्पर आणि जबाबदार जवान म्हणून ओळखले जात होते.
खर्डीगाव येथील ओव्हरहेड वायर्सवर एक कबूतर अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले होते.यावेळी बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या उत्सव पाटील यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.तातडीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.या घटनेत त्यांचे सहकारी जवान आझाद पाटील (वय २९,रा. वाडा,पालघर) हे देखील जखमी झाले असून त्यांच्या हाताला व छातीला दुखापत झाली आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त श्री.दिनेश तायडे,मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.अग्नीशमन दलाच्या एका शूर जवानाच्या निधनाने संपूर्ण दिवा विभागात शोककळा पसरली असून,त्यांच्या निधनामुळे सहकाऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*








