आता गरमीला सुरूवात झाली आहे. अशात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळी उपाय करतात. तुम्हालाही माहीत असेल की, बरेच उन्हाळ्यात रोज जेवताना कांदा खातात. कारण याने शरीर थंड राहतं. त्यासोबतच उन्हाळ्यात याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
कांद्यामध्ये व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे यांसारखे खनिज आहेत. ज्यामुळे शरिराची शक्ती वाढते.
चला जाणून घेऊया कांद्याचे इतरही असे काही फायदे जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील…
1) उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याने तुमचा उन्हापासून बचाव होतो. कारण कांदा थंड असतो. याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. कांदा खाल्ल्याने तुम्हाला उन्ह लागत नाही.
2) तसेच जर एखादा कीटक किंवा कीडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांदा कापून लावा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
3) कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल, तर त्या जागेवर कांदा लावा. लगेच त्याचा फायदा बघायला मिळेल.
4) कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उन्ह लागत नाही. असे केल्यास उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो. यासोबत उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याचेही अनेक फायदे आहेत.
5) अर्धा कप पांढऱ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्याल तर काविळापासून आराम आराम मिळू शकतो. लहान कांदा साफ करून चौकोनी आकारात कापा आणि ते लिंबूच्या रसात भिजवा. त्यावर मीठ किंवा काळं मीठ टाका. काविळावर हा चांगला उपाय मानला जातो.
6) जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.
7) कांद्याच्या रसात मध मिक्स करून चाटण तयार त्याने दम्याचा त्रास कमी होतो. यासोबतच खोकल्यासाठीही या उपाय चांगला मानला जातो.
8) मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या बेंबीवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा