इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; आता गृहखात्यात मिळाली मोठी जबाबदारी….

Spread the love

मुंबई- इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांच्याकडे आता गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता त्यांच्याकडे गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

बदलापूरमधील प्रकरणावरून राज्यात सरकारवरोधात तसेच पोलीस प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चहल याआधी मुंबई महापालिका आयुक्तपदी दीर्घकाळ राहिले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पाच महिन्यात पुन्हा एकदा चहल यांची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page