राजापूरकरांवर पाणी टंचाइचे भीषण संकट , नशीबी पाण्यासाठी वणवण कायम…

Spread the love

गंगामाइच्या आगमनाने दिलासा मात्र देवझरीवर नगर परिषदेचा अडथळा

राजापूर / प्रतिनिधी – मार्च महिण्यापासुन जाणवु लागलेली पाणी टंचाइ दिवसेनदिवस उग्ररुप धारण करु लागली असुन राजापूर शहरवासियांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे . दोन दिवसाआडही अनियमितपणे व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठयामुळे शहरवासियाना पाण्यासाठी पायपिठ करावी लागत आहे .तर सकाळी स्नानासाठी उन्हाळे व गंगा या ठिकाणी नागरिकाना पायपिठ करावी लागत आहे . मात्र हाकेच्या अंतरावर असणाऱ्या देवझरीवर नगर परिषदेच्या विकासकामाचा अडथळा निर्माण झाल्याने नागरिकान्मधुन संतापजन प्रतिक्रिया उमटत आहेत.

२६ मार्च २०२४ पासुन राजापूर नगर परिषदने पाणी कपात करताना राजापूर शहरवासियाना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता . मात्र एक दिवसाआड पाणी पुरवठा करुनही पाणी पातळी घटल्याने अखेर एप्रिल महिण्यातच राजापूर नगर परिषदेने दोन दिवसा आड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे . दोन दिवसानी नळाद्वारे येणारे पाणीही अत्यल्प व कमी दाबाने असल्याने राजापूरकराना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे . त्यातच उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेले चाकरमानी व पाहुणे मंडळी यामुळे घरात माणसे वाढल्याने या सगळ्याना पाणी कुठुन आणणार असा प्रश्न राजापूर वासियांसमोर उभा आहे .

मात्र यावर्षी २४ मार्च रोजी राजापूरच्या गंगामाइचे आगमन झाले असल्याने सध्या पाणी टंचाइचा सामना करताना राजापूर वासिय पाहुणे व चाकरमानी मंडळींसह स्नानासाठी व कपडे धुण्यासाठी शहरापासुन सुमारे तीन किलोमोटर अंतरावर असणाऱ्या उन्हाळे ( गरम पाण्याचा झरा ) व गंगाक्षेत्री पायपिठ करत असल्याचे चित्र आहे . जीवघेण्या उष्णतेच्या काळातही राजापूरची गंगा प्रवाहीत असल्याने राजापूरकराना पाणी टंचाइपासुन थोडा दिलासा मिळत असला तरी पाण्यासाठीची पायपिठ मात्र संपलेली नाही .

त्यातच राजापूर नगर परिषदेने शहरात दिवटेवाडीसह अन्य भागात असणाऱ्या नैसर्गिक पाणी स्त्रोताच्या ठिकाणी वाकासकामाना सुरुवात केल्याने त्या ठिकाणचेही पाणी पिण्यासाठी मिळत नसल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे . दिवटेवाडी येथील देवझरी या ठिकाणी वर्षभर असणारा पाण्याचा जिवंत झरा येथील नागरिकांसाठी आशेचा किरण होता मात्र या ठिकाणी पाणी भिषण टंचाइच्या काळातच राजापूर नगर परिषदेने संरक्षक भिंतीचे काम हाती घेतल्याने नागरिकाना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे . राजापूर नगर परिषदेकडुन दोन दिवसाआड होणारा अनियमित व कमी दाबाचा पाणी पुरवठा यामुळे नागरिकाना पिण्याचे पाणीही मिळणे मुश्किल झाले आहे .


गतवर्षी राजापूर नगर परिषदेने शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली या नद्यान्मधील गाळ उपसा लोकसहभागातुन करताना राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणातीलही गाळ उपसा केला होता . त्यामुळे यावर्षी पाणी टंचाइच्या झळा कमी प्रमाणात जाणवतील असा कयास बांधला जात असताना राजापूरवासियाना भिषण पाणी टंचाइचा सामना करावा लागत आहे . त्यातच कोदवली नदीतील गाळ उपसा केल्याने शहरातील भटाळी , बाजारपेठ या भागातील विहीरीही पुर्णत: आटल्या आहेत परिणामी नागरिकाना दोन दिवसाआड अनियमित व कमी दाबाने येणाऱ्या नळाच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागत आहे . तर हे नळाचे पाणीही पुरेसे नसल्याने पाण्यासाठी पायपिठ करण्याची वेळ आली आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page