लोकसभेत कोकणातील शेतकऱ्यांचे, पर्यटन व ग्राम उद्योजकतेचे प्रश्न मांडणारा जेष्ठ उमेदवार दिल्याने आनंद..!

Spread the love

जेष्ठ नेते नारायण राणे साहेब किंवा भाजपाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ मिळाला नसता तर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर हे अपक्ष अर्ज भरणार होते. तसेच पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे ज्ञानेश पोतकर भाजपाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती !

भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर हे भाजपाचे तळमळीचे कार्यकर्ते म्हणुन कोकणात सुपरिचित आहेतच पण राष्ट्रप्रथम या संकल्पनेतून कार्य करणार्‍या पक्षाचा मी एक राष्ट्रावादी विचारांचा सामान्य कार्यकर्ता आहे याचा अभिमान आहे हे आवर्जून नमूद करतात. त्याशिवाय कोकणातील शेतकर्‍यांच्या बाबतीत अनेकदा त्यांनी सहकार्य केले असल्याने आणि ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करताना त्यांनी त्यांच्या कार्याची अनेकदा चुणूक दाखवली आहे.

भाजपा पक्षाच्या माध्यामातून त्यांनी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले आहे. त्यांचे आजोबा गुरूवर्य स्व. पोतकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून, पक्षाच्या माध्यामातून ग्रामीण भागात कार्यरत असतात. भाजपाचे जेष्ठ नेते स्व. शंकर तथा बडूकाका पाटकर यांनी त्यांना त्यांची चुणूक ओळखून सामाजिक, राजकीय कार्यात अधिक सक्षम केले. ग्रामविकासात कार्य असणार्‍या जेष्ठ मंडळींचे आशिर्वाद मिळाले आहे. वडिल सुभाष पोतकर आणि जेष्ठ नेते नानासाहेब शिंदे यांच्या सहवासात त्यांनी अधिक जोराने जोमाने कार्य सुरू ठेवले आहे. स्व. बडूकाका पाटकर यांचे चिरंजीव युवा नेतृत्व सुशांत पाटकर यांच्या सोबत सावलीसारखे सोबत असतात, ज्ञानेश व सुशांत ही भाजपाची राम लक्ष्मणाची जोडी म्हणुन प्रसिद्ध आहे.

अशातच स्वतः उच्चशिक्षित असून ते वकीली क्षेत्रातील जेष्ठ श्री. अविनाश तथा भाऊ शेटये हे यांच्याकडे प्रॅक्टिस करता करता कोकणातील शेतकर्‍यांना महत्त्वाचे मार्गदर्शक होऊन नेतृत्व करीत आहेत. मंत्री महोदय रविंद्र चव्हाण साहेब, निलेशजी राणे साहेब, संजय यादवराव यांचे मोलाचे सहकार्य असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकण आंबा बागायतदार शेतकरी संघटनेत व कोकण चळवळीतील सक्रिय असल्याने इतर पक्षातील लोकांशी मित्रत्वाचे संबंध आहेत.

संजय यादवराव यांच्यामुळे ते कोकण चळवळीत सक्रिय झाले. पर्यटन, ग्रामविकास, शेती आणि त्याला कायद्याच्या सहकार्याने कार्य करताना दिसतात. कोकणातील शेतकर्‍यांसाठी कार्य करताना झोकून देणे हे यांचे वैशिष्ट्य. कोकणातील विविध प्रश्नांबाबत ते अभ्यासपूर्ण असे विषय आमद श्री. शेखरजी निकम व आमदार नितेशजी राणे यांना देऊन ते विधिमंडळात मांडण्याची व्यवस्था करीत असतात. त्यांच्या या अभ्यासपूर्ण कार्यावर आमद श्री. शेखरजी निकम व आमदार नितेशजी राणे हे कायमच खुश असतात.

ज्ञानेश पोतकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांना कृषी पंप यांच्या जाचक, वाढीव बिले यावर महाराष्ट्र वीज वितरण आयोगाच्या जनसुनावणीमध्ये कोकणातील शेतकर्‍यांची बाजू कोणताही मोबदला न घेता स्पष्टपणे, आक्रमकपणे मांडली त्यावर आयोगाने सकारात्मक भूमिका घेऊन कोकणातील कृषी पंप यांना लावलेले जाचक टेरिफ ज्याने शेतकर्‍यांना लाखो रुपयांची बिले आली ते रद्द करण्यात यशस्वी झाले.

आक्रमकता, कार्य करण्याची पद्धती यामुळे नीलेश राणे यांचे विशेष सहकार्य त्यांना कायम असते.

अनेक वर्षे कोकणातील विविध प्रश्नांवर कार्य करताना पक्षाच्या वरीष्ठ यांनी मोठी जबाबदारी दिली आणि रत्नागिरी जिल्ह्याची किसान मोर्चाची कमान सांभाळायचे आदेश त्यांना दिले गेले त्यानुसार अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर रत्नागिरी भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे.

ते म्हणाले,
“या मतदारसंघातून बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू यांसारखे उच्चविद्याविभूषित मातब्बर लोकसभेत निवडून गेले आहे. निलेश राणेंसारखे आक्रमक युवा यांनी प्रतिनिधित्व केले आहे. पण गेल्या दहा वर्षात निष्क्रिय असलेले खासदार महोदय दुर्दैवाने कोकणाला लाभले. निलेश राणे हे खासदार नसताना सुद्धा शेतकर्‍यांच्या कृषी पंपच्या वाढीव बिलांबाबत आक्रमक झाले होऊन आम्हाला सहकार्य केले होते. पण या आताच्या खासदारांनी त्यावर काहीही तोंड उघडले नाही. केंद्रीय मंत्री राणे साहेब त्यांच्याकडे असलेल्या एमएमएमई मार्फत कोकणातील छोट्या उद्योगांना सहकार्य करत आहेतच पण आता कोकणाविषयी आत्मीयता असलेला राणे साहेबांसारखा खासदार थेट लोकसभेला निवडून आणूच जेणेकरून निष्क्रिय असलेले महोदय आता घरी बसतील.”

भाजपा हा एकमेव पक्ष असा आहे जो सामान्य कार्यकर्त्याला मेरीटवर मोठी जबाबदारी देतो. अशी असंख्य उदाहरणे आज देशात आहे. त्यानुसार अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यासारख्या प्रतिभावान, कर्तृत्ववान व उच्चविद्याविभूषित युवकांना मोठी जबाबदारी दिली तर अधिक सक्षमपणे कोकणासाठी कार्य करतील. आता लोकसभेला यांना संधी मिळाली नसली तरी येणार्‍या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी हे उत्तम उमेदवार आहेत. राणे साहेबांनी अशा युवकांकडे लक्ष देऊन त्यांना संधी देऊन निवडून आणणे महत्त्वाचे आहे जेणेकरून नवीन नेतृत्व तयार होतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page