गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषदेत झळकावला नथुराम गोडसेचा फोटो; म्हणाले,नथुरामजी…

Spread the love

मुंबई- वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा फोटो झळकावला आहे. एवढंच नव्हे तर नथुराम गोडसेबरोबर न्याय झाला नव्हता, असं मोठं विधान सदावर्ते यांनी केलं आहे. सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फोटोजवळ नथुराम गोडसेचा फोटो ठेवला होता.

पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘आज पत्रकार परिषदेत आपल्याला एक फोटो दिसत आहे. तो फोटो नथुरामजी गोडसेंचा आहे. मला या महाराष्ट्राला, देशाला, तमाम कट्टर संघटनांना, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, १०० पैकी एखाद्या मतावर नथुराम गोडसेबाबत चर्चा होऊ शकते, पण बाकी मतांवर देशातील कुणीही असहमत नाहीये. याचं कारण असं आहे की, या देशातील कुणीही माणूस माझ्या हिंदुस्तानला कापा आणि बाजुला करा, असं म्हणणारा नाही’.

‘मी एक वकील होतो. मी महाराष्ट्रातील विधिज्ञ म्हणून मोठे खटले दाखल केले. त्याचबरोबर संविधानाचा अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्हाला सांगायचं आहे की, नथुरामजी गोडसे यांच्याबाबत जी सुनावणी पार पडली. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. तेव्हा नथुरामजी गोडसेबरोबर न्याय झाला नव्हता. हे वेदनादायक आहे, हे मला सांगायचं आहे’, असं विधान सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत केलं.

दरम्यान, सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवायचा आहे. त्यासाठी आपण उद्यापासून राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहे, असंही सदावर्तेंनी जाहीर केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page