श्रीकृष्ण खातू /संगमेश्वर – सुपोषित भारत सेवाभारती,कोकण प्रांत, द.रत्नागिरी जिल्हा सुपोषण जागरूकता अभियान १ते ३० सप्टेंबर अखेर फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या माध्यमातून २१ शाळांमध्ये राबवण्यात आले.
यावेळी,विज्ञान प्रयोग शाळेचे प्रशिक्षक,दिलीप काजवे यांनी पोषणाची पाच तत्वे सखोल स्पष्टिकरणाने विद्यार्थ्याना व पालकांना समजावून सांगतांना,पहिल्या सोनेरी १००० दिवसांत,पौष्टिक आहार, अशक्तपणा प्रतिबंध,अति सागर प्रतिबंधीत,स्वच्छता आणि साफसफाई अशा तत्वांची माहिती पूर्ण स्पष्टिकरणाने दिली.
गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या कालावधीचा समावेश होतो.मूल सहा महिन्याचे झाल्यावर आईच्या दुधासोबत सुका मेवा,भोपळा, दुधी भोपळा, गाजर,पालक,कडधान्यं असे पूरक पदार्थ खाऊ घाला. अशक्तपणा टाळण्यासाठी लोहयुक्त आहार द्यावा,
वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता, आहार स्वच्छतेची काळजी घ्या. अतिसार टाळण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. स्वच्छतेची काळजी घेऊन स्वयंपाकापूर्वी,शौच केल्या नंतर, स्तनपान करण्या पूर्वी नेहमी साबण पाण्याने हात धुवा.मुलांना खायला देण्यापूर्वी मुलाचे हात धुवा.अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
यासाठी प्रत्येक शाळेतून विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे चांगले सहकार्य मिळाले.