मुंडे महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा व गुड टच बॅड टच’या विषयावर मार्गदर्शन …

Spread the love

मंडणगड (प्रतिनिधी)- सद्या सर्वत्र वाढत असलेल्या महिला व मुली यांच्या वरील अत्याचाराच्या घटनांच्या अनुशंगाने सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मंडणगड पोलीस स्टेशन याच्या संयुक्त विद्यमाने. ‘सायबर सुरक्षा व गुड टच बॅड टच’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री. नितीन गवारे, पोलीस वैशाली चव्हाण, आम्रपाली आवळे व अंजली सहारे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, पोलीस वैभव गमरे, पोलीसमित्र शीतल मर्चंडे, डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शामराव वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरिक्षक श्री. नितीन गवारे म्हणाले की, विद्याथ्र्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित व काळजीपूर्वक करावा. कारण आज समाजात आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठया प्रमाणात होताना आपण पाहतो. म्हणून अनोळखी फोन आल्यास त्याला बळी न पडता म्हणजेच आपली माहिती न देता ते टाळले पाहिजे. म्हणून शक्यतो अतिशय सावधानता बाळगून असे व्यवहार करावेत. बॅंका, बीएसएनएल, एमएसइबी, लॉटरी, गुंतवणूक करा, बक्षीस लागले आहे, अशा पध्दतीने आलेल्या मेसेजला बळी पडू नका. सुरक्षिततेच्या दृश्टिकोनातून. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अजिबात शेअर करता कामा नये. आपले पासवर्ड, ए.टी.एम पिन आदी सतत बदलत राहिले पाहिजे.
पोलीस वैशली चव्हाण यांनी चुकीचे मेसेज फारवर्ड करणे किवा काही प्रलोभने दाखविणे किंवा एखादी लिंक डाऊनलोड करण्यास सांगणे किवा ओटीपी शेअर करायला सांगणे अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत अन्यथा आपले न भरून निघण्यासारखे नुकसान होऊ शकते. वेळीच सावध झाले पाहिजे. सायबर गुन्हेगारीवर प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. एकूण सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला पाहिजे. चुकून काही घडल्यास पोलीस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा. असे त्यांनी सांगितले. तर आम्रपाली आवळे यांनी ‘गुड टच व बॅड टच’ कसा ओळखा, आपल्या संरक्षणासाठी काय करायचे निर्भया पथक आणि पोलीस हेल्पलाईनची सविस्तर माहिती देवून संपर्क करण्याचे आवाहन केले.


अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की, मूलींनी आजच्या युगात स्वसंरक्षण करण्यासाठी तयार झाले पाहिजे. आज मुली शिक्षण व नोकरीसाठी बाहेर पडत असतात. बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. त्याकरिता काळाची गरज म्हणून मुलींनी स्व-संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक आहे. मुलींनी स्वसंरक्षणाची माहिती करुन घेतल्यास त्या स्वतःचे संरक्षण स्वतः करु शकतील.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. विष्णु जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋणाली सागवेकर हिने तर शेवटी आभार कु. मिनाक्षी लोखंडे हिने मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page