*रत्नागिरी, दि. 8 (जिमाका) : उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.*
शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक, येथे आगमन व पालीकडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता पाली येथे आगमन व राखीव.
सकाळी 8.30 वाजता जाकादेवी/खालगांव येथील न.पा.पु. योजना संदर्भात ग्रामस्थांसमवेत बैठक (स्थळ : पाली निवासस्थान, पाली)
सकाळी 10 वाजता नॅशनल हायवे NH-६६ संदर्भात हातखंबा तारवेवाडी येथील ग्रामस्थांसमवेत बैठक (स्थळ : हातखंबा तारवेवाडी, निवळी तिठा)
सकाळी 11.30 वाजता १) राजापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पासंदर्भात बैठक, २) पाटबंधारे विभाग पाचांबे, ता. संगमेश्वर येथील (गडनदी प्रकल्प) बाधित समस्यांबाबत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी)
दुपारी 12.30 वाजता दाभोळ वीज प्रकल्प कामगार संघ यांच्या अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 1.30 वाजता जे.एस.डब्ल्यू. कंपनीबाबत जयगड सयेवाडी यांच्या अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय)
दुपारी 2 वाजता फिनोलेक्स कंपनीबाबत गोळप व पावस पंचक्रोशीतील कामगारांच्या समस्यांबाबत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी)
दुपारी 2.30 वाजता नाणार, सागवे आणि बारसु ता.राजापूर येथील ग्रामस्थांसमवेत चर्चा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 3.30 वाजता राखीव.
सायंकाळी 4 वाजता प्रादेशिक मनोरूग्णालय, रत्नागिरी येथील सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतन व अडचणींसंदर्भात बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय)
सायंकाळी 5 वाजता भेटीसाठी राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव.
शनिवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता पावस येथील महिला बचत भवनाचे उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : पावस, ता. जि. रत्नागिरी)
दुपारी 12 वाजता पावस ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन समारंभ (स्थळ : पावस, ता. जि. रत्नागिरी)
दुपारी 1 वाजता डोर्ले येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत गावभेट (स्थळ : डोर्ले, ता. जि. रत्नागिरी)
दुपारी 2 वाजता गावडे आंबेरे येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत गावभेट (स्थळ : गावडे आंबेरे, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव.