
जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०५, २०२३.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा मयुरी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राहुल देसाई आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा यावेळी आढावा घेतला. या योजनेंतर्गत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने संबंधित विभागाने आपल्या स्तरावर आढावा घेऊन कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याच्या नियोजनाबाबत तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा संबंधित विभागांकडून आढावा घेतला.