कडवई येथे तरुण उदयोजक सिद्धेश ब्रीद यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
▪️संगमेश्वर कडवई येथे तरुण उदयोजक सिद्धेश ब्रीद यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री मा.नामदार उदय सामंत यांचे हस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी तुरळ येथील पांडुरंगाचे भक्त वारकरी सांप्रदायच्या वारकऱ्यांचे उदयजी सामंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
▪️सत्कार मुर्ती मध्ये ह.भ.प. नंदकुमार लिंगायत महाराज, ह.भ.प.आप्पा फडकले महाराज, ह.भ.प.बाळक्रुष्ण डिके महाराज, ह.भ.प.प्रकाश चव्हाण महाराज, ह.भ.प.सुरेश जाधव महाराज, ह.भ.प.विलास गुरव महाराज, ह.भ.प.विलास जाधव-देसाई महाराज, ह.भ.प.सुरेश सुवरे महाराज, ह.भ.प.कमलाकर देसाई महाराज आदि वारकरी सांप्रदाय चे सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
▪️याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार शिवसेनेचे तरुण नेत्रुत्व व उद्योजक सिद्धेश ब्रीद, शिवसेना नेते सहदेव बेटकर, माजी सभापती क्रुष्णा हरेकर, तुरळचे माजी सरपंच आणि शिवसेना उपविभाग प्रमुख शंकर लिंगायत, शिवसेना विभागप्रमुख वसंत उजगावकर आदी शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.