![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231206-WA0038-1.jpg)
उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई ,ता. उरण जि. रायगड. या विद्यालयात भारतरत्न, महामानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ,त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यागमय जीवनकार्य आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून मांडले.
विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस. यांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्राध्यापक तोरणे सर विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य गणेश पाटील ,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.शिंदे एस.एस.गुरुकुल विभाग प्रमुख ठाकरे एस.पी.सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घरत पी.जे. यांनी केले तर रयतसेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.