मुंबई : आजी-आजोबांच्या बालपणीच्या आठवणी होणार ताज्या
आजी-आजोबाच नातवाचे पहिले मित्र असतात. नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडणघडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवाशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे, आजच्या काळात महत्वपूर्ण असून राज्यातील सर्व शाळांमध्ये यावर्षी आज १० फेब्रुवारी रोजी आजी-आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे वयोवृद्धांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये हा दिवस साजरा करण्याबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांना हा दिवस साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडिल नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने मुलांची जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घराला जास्त वेळ ते आजी-आजोबा यांच्यासोबतच घालवत असतात. आजी-आजोबा व नात किंवा नातू हे नाते अतिशय विलक्षण असते. हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जाहिरात :