मान्यवरांची उपस्थिती; स्वामिनी पेट्रोलियम येथे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध
चिपळूण : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या सहाव्या शॉपीचे आज सायंकाळी कामथे येथे स्वामिनी पेट्रोलियम या पेट्रोलपंपाच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले.
यावेळी वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, सावर्डे येथील डॉ. अरुण पाटील, डॉ. माधुरी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मोरे, ग्लोबल टुरिझमचे रमण डांगे, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संदीप पाटील, गणेश कदम, वैभव चव्हाण, आर्किटेक्चर शशांक मोहिते, सनी साळवी, गुड्डू वर्मा, उपस्थित होते. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.ने चिपळूण शहर आणि परिसरात आतापर्यंत पाच शॉपीज् सुरू केल्या आहेत. या सर्वच शॉपींना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दर्जेदार उत्पादन आणि विश्वासार्हता यामुळे दुधासह वाशिष्ठी डेअरीची सर्वच उत्पादने अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. स्वामिनी पेट्रोलियम येथे सुरू केलेल्या शॉपीमध्येही देखील वाशिष्ठी डेअरीची सर्वच उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यात दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, तूप, ताक, फ्लेवर्ड मिल्क, पनीर पेठा, बासुंदी, पेढा आदी उत्पादनांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाचा आनंद
‘वाशिष्ठी’संग करा द्विगुणित!
गणेशोत्सवाचे खास आकर्षण असणारे वाशिष्ठी डेअरीचे चवदार, दर्जेदार मोदकही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबतच वाशिष्ठी डेअरीने प्रकाशित केलेला खास आरती संग्रह ग्राहकांना भेट दिला जाणार आहे.