
प्रतिनिधी :- विनोद चव्हाण कोजागिरी च्या निमित्ताने लक्ष्मीनगर रेसीडेन्ट असोसिएशन आयोजित भव्य लॉटरी सोडत नुकतीच दुर्गामाता मंदिर नवरात्री उत्सव मंडळ, नालासोपारा पुर्व येथे संपन्न झाली.
सर्वाना एकत्र येण्यासाठी अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला याला बाराशेपेक्षा जास्त महिला पुरुष आणि युवक यांनी सहभाग घेतला होता. भव्य लॉटरी सोडत मध्ये प्रथम आकर्षक बक्षिस सौ. वैशाली शिवगण यांना फ्रीज, दुसरा बक्षिस अल्पेश लोडिया यांना एल. ई. डी. टी व्ही आणि तिसरे बक्षिस दिनेश विश्वकर्मा यांना अँड्रॉईड मोबाईल देऊन सन्मान करण्यात आले. तसेच अशी बीस आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली.

नवरात्री मध्ये रास गरबा निमित्त उत्तम वेशभूषा केलेल्या प्रथम क्रमांक कु. त्रिशा पालव हिने यल्लमा देवी अवतार, दुसरा क्रमांक अर्चित बाचरेआणि वर्षा कानोजिया यांनी शंकर पार्वती आणि तिसरा क्रमांक देवांश गुप्ता यांनी पेशंट यांची भूमिका साकार केलेल्या बालगोपाल यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष शिवाजी पाटील, पत्रकार विनोद चव्हाण, सोसायटी अध्यक्ष श्री अशोक चव्हाण, उपाध्यक्ष श्री दानबहादूर सिह ठाकूर, सचिव जनार्दन धयाळकर, सहसचिव संदीप कुळये, खजिनदार दीपक चव्हाण, सहखजिनदार सुरेश नवलू आणि उत्सव मंडळ अध्यक्ष केशव बाईत,उपाधक्ष विनोद मोहिते, केशव गोळे, रमाकांत शिंदे,सुशांत चव्हाण, सचिन शिंदे, शरद टेमकर, रमेश कदम, संदीप खामकर,राजेश धयाळकर,
आकाश चव्हाण,विघ्नेश धयाळकर, प्रणय मोहिते, ट्रिंकेश गुप्ता उपस्थित होते.
रास गरबा मध्ये नऊ दिवस सातत्याने असलेला सहभाग
अश्विनी चव्हाण, गीता सावंत, रेश्मा मांगले, वर्षा अनिल, परमार, श्रवणी डिके, दिशा टेमकर, सोलकर, प्राची, आर्या शिरगांवकर, शेजल, कोमल बाईत, दिप्ती आणि डॉ वंदना,यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीनगर रेसीडेन्ट असोसिएशन सचिव सन्माननीय जनार्दन धयाळकर यांनी केले.
जाहिरात
