मुंबई /01 मार्च- मागील काही महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती आणि गोष्टींच्या किमतीमध्ये बदल होत असतात. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी किमतींमध्ये वाढ केली आहे. व्यावसायिक १९ किलो सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
इंडियन ऑईल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक १९ किलो सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. तर विविध शहरांमध्ये सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल झाले आहेत. १९ किलो सिलेंडरच्या किमतीमध्ये २५.५० पैश्यांची वाढ झाली आहे. तर घरगुती १४ किलो सिलेंडच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये सलग दुसऱ्यांदा मोठी वाढ झाली आहे. २०२४ या चालू वर्षात दोनदा व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. होळी हा सण २४ आणि २५ मार्चला आहे. हा सण देशभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याआधीच सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर दिल्लीमध्ये १,७९५ रुपये किंमत झाली आहे. मुंबईमध्ये १,७२३ रुपये, कोलकाता १,९११ रुपये झाला आहे. सिलेंडरच्या किमतीमध्ये सगळ्यात मोठी वाढ मुंबई आणि दिल्लीमध्ये झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये १४ रुपयांची वाढ झाली होती.
घरगुती सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. घरगुती सिलेंडरच्या दरात ३० ऑगस्ट रोजी बदल करण्यात आला होता. दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरचे दर ९०३ रुपये आहे. चेन्नईमध्ये ९८१ रुपये, मुंबईमध्ये ९०२ रुपये किंमत आहे. तर कोलकातामध्ये ९२९ रुपये किंमत आहे.