
मुंबई : राज्य पोलिस दलातील १५,६३१ पोलिसांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गृह विभागाने आज बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दोन आठवड्यांपूर्वीच पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता.
गृह विभागाच्या ‘जीआर’ नुसार महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील १५ हजार ६३१ रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.

या भरतीअंतर्गत पोलिस शिपायांची १२ हजार ३९९ पदे, पोलिस शिपाई चालकांची २३४ , बँड्समनची २५ , सशस्त्र पोलिस शिपायांची २ हजार ३९३ आणि कारागृह शिपायांच्या ५८० पदांचा समावेश आहे.
दरम्यान, २०२२ आणि २०२३ मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकवेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी या पूर्वीच्या पोलिस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५० रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे .
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*