
मुंबई : डिजीटल पेमेंट सुविधा उपलब्ध झाल्यापासून अनेकजण गुगल पे, फोन पे अशा अॅपचा वापर करतात. यामध्ये मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंट अशा इतर सेवांसाठी गुगल पे वापरतात. आतापर्यंत गुगल पे त्यांच्या सेवा मोफत देत होते, परंतु आता कंपनीकडून नियमावलीत काहीसे बदल करण्यात आले आहे. यामुळे गुगल पे युझर्सना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “गूगल पे ने गॅस आणि वीज बिलांसारख्या पेमेंटसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या युझर्सकडून ‘प्रक्रिया शुल्क’ आकारण्यास सुरुवात केली आहे. फोनपे आणि पेटीएम देखील बिल पेमेंट, रिचार्ज आणि इतर सेवांसाठी समान शुल्क आकारतात. हे शुल्क व्यवहार रकमेच्या ०.५ टक्के ते १ टक्क्यांपर्यंत असू शकते. या प्रोसेसिंग शुल्कावर उत्पादन शुल्क आणि सेवा कर (जीएसटी) देखील आकारला जात आहे.
गुगल पे वर प्रक्रिया शुल्क कसे तपासाल ?…
जर प्रक्रिया शुल्क लागू असेल, तर पेमेंट करताना तुम्हाला ते कोणत्याही बिलाच्या रकमेसह दिसेल. तुम्ही Google Pay अॅपच्या जुन्या व्यवहारात प्रक्रिया शुल्क देखील पाहू शकता. त्यामध्ये बिलाच्या रकमेसह आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क सूचीबद्ध आहे.