चिपळूण- संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे सड्येवाडी येथील गणेश मित्र मंडळ आयोजित सत्यनारायण महापुजेस चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी भेट दिली.
▪️ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांनी कार्यक्रमास दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल तसेच त्यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानले व त्यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
▪️या कार्यक्रमाच्यावेळी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, गावातील विकासकामांबाबत चर्चा केली,अडीअडचणी जाणून घेतल्या व उर्वरीत विकास कामे व गावाचा विकास पुढील येणा-या काळात निश्चित टप्या-टप्याने पुर्ण करु असा ग्रामस्थांना विश्वास दिला.
▪️यावेळी सरपंच कृष्णा जोगळे, उपसरपंच विजय जोगळे, रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशिल भायजे,गणपत चव्हाण,संतोष विरकर,अर्जुन जोगळे,महादेव मदगले (गाव प्रमुख),दिपक मदगले (वाडी प्रमुख),चंद्रकांत पवार,भिकाजी जोगळे,कृष्णा जोगळे,गुलाबराव सुर्वे,गावकरी मंडळी,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.