नेरळ आरोग्य शिबीरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.डॉ फिझा तांबोळी यांचा पुढाकार…..

Spread the love

*नेरळ- सुमित क्षिरसागर –* सुधाकर घारे फौंडेशन आणि AIMS हॉस्पिटल डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ शहरात डॉक्टर फिझा आयुब तांबोळी यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराला नेरळ व परिसरातील शेकडो नागरिकांनी भेट देत लाभ घेतला.दरम्यान डॉक्टर फिझा तांबोळी यांनी असे सामाजिक उपक्रम याही पुढे दुर्गम भागात राबवावे जेणेकरून गोरगरिबांना याचा फायदा सर्वाधिक घेता येईल म्हणून शिबिरात उपस्थित झालेल्या जेष्ठ नागरिकांनी मागणी केली.
       
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजबाग या उच्चभ्रू सोसायटीच्या परिसरात आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सुधाकर घारे फौंडेशनचे सर्व्हेसर्वा तसेच राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भगवन चंचे,एकनाथ धुळे,अल्पसंख्याकाचे जिल्ह्या उपाध्यक्ष आयुब तांबोळी,महिला तालुका अध्यक्षा अँड रंजना धुळे,युवक उप जिल्ह्या अध्यक्ष उत्तम पालांडे,नेरळ शहर अध्यक्ष धनाजी गरुड,गणेश खराटे,राष्ट्रवादीचे जिल्हा डॉक्टर्स सेल अध्यक्ष डॉ फिझा तांबोळी यांसह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते,तर यावेळी AIMS हॉस्पिटलचे डॉ. अनिता चौरीसिया,डॉ. मोहसिन काझी,डॉ. महेंद्र बर्गल,डॉ. तस्मिया तांबोळी, डॉ.मोहम्मद सयद अन्य स्टाफ उपस्थित होते आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिक देखील शिबिराला उपस्थित झाले होते.
    
या शिबिरात प्रामुख्याने सर्वसाधारण आरोग्य तपासणी,ईसीजी (ECG),बीएमआय (BMI) मोजणे,रक्तदाब तपासणी,मधुमेह तपासणी, महिलांसाठी कॅन्सर तपासणी या शिवाय डोळे तपासणी तर अन्य सोयी सुविधा देखील नागरिकांसाठी मोफत पुरवण्यात आल्या होत्या.या शिबाराचा नेरळ शहर,परिसर तसेच दुर्गम भागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.असे मोफत आरोग्य शिबीर आणखी राबवण्याची गरज असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
        
आरोग्य शिबिराचे मुख्य आयोजक तथा राष्ट्रवादीचे जिल्हा डॉक्टर्स सेल अध्यक्ष डॉ फिझा आयुब  तांबोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगतले की कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो, हाताच्या बोटावर कमवून घरगाडा चालवणारे नागरिक अनेक व्याधी पासून पीडित असतात, परंतु पैसे अभावी ते आपल्या आरोग्याची पर्वा न करता संकटाशी सामना करीत असतात मी डॉक्टर आहे आणि मनुष्य देखील,प्रत्येक मनुष्याने एकमेकांची काळजी घेणे, मदत करणे हा एक धर्म आहे आणि तो मी करत आहे आणि याही पुढे करत राहणार असे डॉ फिझा यांनी सांगितले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page