मुंबई- सध्या जरी पावसामुळे विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असला तरी येत्या काही वर्षात हा त्रास थांबण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून महावितरण कंपनीला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यातून २७५० किमीच्या भूमिगत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या योजनेतून मंडणगड, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्येही किनारी भागातील विद्युत ग्राहकांना विनाखंडित सेवा मिळावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून हे काम सुरू झाले आहे.
महावितरण कंपनीने याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. सुमारे ५७२ कोटींच्या या प्रकल्पातून किनारपट्टी भागात २ किमी अंतरापर्यंतच्या वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. यामध्ये लघुदाब २२०० किमी, तर उच्चदाब ५५० किमी विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. दापोली किनारपट्टीवर लघुदाब ३५० किमी भूमिगत वाहिन्यांसाठी ३६ कोटी, तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजूर आहेत, मंडणगड – लघुदाब ६५ किमीसाठी ७ कोटी, तर उच्चदाब २० किमीसाठी ७ कोटी, रत्नागिरी लघुदाब ४९१ किमीसाठी ४६ कोटी तर उच्चदाब ३१० किमी ५७ कोटी मंजूर आहेत. राजापूर लघुदाब २६३ किमीसाठी २८ कोटी तर उच्बदाब ९६ किमी २२ कोटी, गुहागर लघुदाब ४८० किमीसाठी ४९ कोटी तर उच्चदाब २६० किमी ११४ कोटी, तर दापोली तालुक्यात किनारपट्टी भागात लघुदाब ३५० किमीला ३६ कोटी, तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजूर आहेत. या प्रकल्पासाठी एजन्सी नेमण्यात आली असून, काम सुरू झाले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
🔹️चक्रीवादळातील नुकसान टळणार
यापूर्वी झालेल्या तौक्ते, निसर्ग चक्रीवादळाने किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. भविष्यात कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारची चक्रीवादळे धडकण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भूमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.याचे साहित्य मोठ्या प्रमाणात रत्नागिरी येथे पोहोचू लागल्याचे दिसून येत आहे
🔹️एकूण ट्रान्सफॉर्मर २२३
▪️२५ केव्ही ८
▪️६३ केव्ही ७६
▪️१०० केव्ही १०७
▪️२०० केव्ही ३००