
चीनमध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे. 000 मेट्रिक टन सोन्याचे भांडार आहेत. याची किंमत 83 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या देशात सापडले सोन्याचे महाभंडार! 71,38,02,90,50,000 एवढी किंमत
भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या देशात पुन्हा एकदा सोन्याचे महाभंडार सपाडले आहे. चीनमध्ये 1000 मेट्रिक टन सोन्याचे भांडार सापडले आहे. या सोन्याच्या साठ्याची किंमत 71,38,02,90,50,000 एवढी आहे. या सोन्याच्या साठ्यामुळे चीनची अर्थव्यवस्था रॉकेटसारखी भरारी घेणार असल्याचे तज्ञ सांगतात.
चीनमध्ये सातत्याने सोन्याच्या अनेक साठे सापडत आहेत. आता पुन्हा एकदा चीनमध्ये 1000 मेट्रिक टन सोनं सापडले आहे. चीनमध्ये सापडलेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा साठा असल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या साउथ डीप खाणीपेक्षाही चीनमध्ये सापडलेला हा सोन्याचा साठा अतिश. विशाल आहे.
चीनमध्ये सापडलेल्या या सोन्याच्या साठ्याची किंमत 83 अब्ज अमेरिकन डॉलर्स (600 अब्ज युआन) इतकी आहे. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच, जगभरातील सोन्याच्या किमतींवरही याचा परिणाम होऊ शकतो.
सायन्स अलर्टने याचे वृत्त दिले आहे. चीनच्या हुनान प्रांताच्या भूगर्भीय विभागाने पिंगजियांग काउंटीमध्ये 2 किलोमीटर खोलीवर 40 सोन्याच्या वेली शोधल्या आहेत.येते 300 मेट्रिक टन सोने आहे. थ्रीडी मॉडेलिंगमध्ये येथे तीन किलोमीटर खोलीपर्यंत अधिक साठे सापडू शकतात. येथे 1000 मेट्रिक टनांपर्यंत सोन्याचे साठे असू शकतात. हुनान प्रांतीय भूगर्भीय आपत्ती सर्वेक्षण आणि देखरेख संस्थेचे तंत्रज्ञ पिंगजियांग काउंटीमधील सोन्याच्या खाणींचे नमुने तपासले आहेत.
खोदकाम करताना खडकांच्या गाभ्यांमध्ये सोने आढळून आले असे ब्युरो एक्सप्लोरर चेन रुलिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक मेट्रिक टन धातूमध्ये 138 ग्रॅम पर्यंत सोने असू शकते असे कोर नमुन्यांवरून आढळून आले आहे. येथे उच्च दर्जाचे सोन्याचे साठे आहेत. जागतिक सोन्याच्या बाजारपेठेत चीन आधीच आघाडीवर आहे. चीनच्या खाण उद्योगाचा जागतिक उत्पादनात सुमारे 10 टक्के वाटा आहे. 2024 च्या सुरुवातीला चीनकडे 2000 टनांपेक्षा जास्त सोने होते.