महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

Spread the love

१९ एप्रिल/रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेले काम हा ट्रेलर आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणखीन चित्र स्पष्ट होईल. देश महासत्ता बनेल. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही संकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले पाहिजे. यासाठी देशातून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून रत्नागिरी सिंधदुर्ग जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून देऊया असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. रत्नागिरी येथे जाहीर सभेला ते बोलत होते.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्ष यांची महायुती आहे आणि या महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना उमेदवारी मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणांहून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे असे डाॅ. प्रमोद सावंत म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page