गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात केली पूजा…

Spread the love

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या कोठडीमध्ये बंद करून ठेवले होते तेथे जाऊन घेतले दर्शन…

३ मार्च /रत्नागिरी : गोवा राज्याचे मुख्यमंत्री, कोकण क्लस्टर प्रमुख डाॅ. प्रमोद सावंत यांनी गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात पूजा केली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर, मुख्य पुजारी व डॉ चैतन्य घनवटकर यांनी
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार येऊ दे, भारत महासत्ता होऊ दे, महाराष्ट्र , गोवा त्याचप्रमाणे पूर्ण भारत देशातील जनता सुखी समाधानी होऊ दे यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. त्यानंतर दिवार लेखन अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे रत्नागिरी विधान सभाक्षेत्र प्रमुख बाळ माने उपस्थित होते व त्यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले.

डाॅ. प्रमोद सावंत यांचा गणपतीपुळे दौरा यशस्वी करण्यासाठी अभिजीत घनवटकर आणि मुख्य पुजारी डॉ चैतन्य घनवटकर, अवधूत केळकर, राज देवरुखकर, सर्व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

गणपतीपुळे येथील वातावरण भाजपमय झाले होते. मंगलमूर्ती मोरया, फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार, भारतमाता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर यावेळी दुमदुमून गेला.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या कोठडीमध्ये बंद करून ठेवले होते तेथे जाऊन घेतले दर्शन…

रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या कोठडीत बंदिस्त होते त्या कोठडीला भेट दिली व नतमस्तक गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत झाले. यावेळी सावरकरांनी ज्या वेदना झेलल्या व संघर्ष केला त्यांच्या आठवणींना उजाळा आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. अंदमान मध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला भेट दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकार्यासोबतच समाजक्रांतिकार्य केले ते रत्नागिरीच्या भूमीत. त्यांचे सामाजिक समरसता, जाती उच्चाटन यासाठी केलेले कार्य अपूर्व आहे, आणि पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गौरव उद्गार काढले. यावेळी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही उल्लेख करून यावेळी त्यांनी इतिहासातील घटनांचा उल्लेख करत रत्नागिरी ही रत्नांची भूमी आहे तो वारसा पुढे आपल्याला जपला पाहिजे असं आवर्जून सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page